औरंगाबाद : ईद निमित्त शहरात अडीच हजार पोलिसांचा व एसआरपीच्या २ कंपन्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे.
सर्वांनी आनंदात ईद साजरी करावी. त्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. उद्या ईदनिमित्त शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तात तीन पोलिस उपायुक्त, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त, वीस पोलीस निरीक्षक, १०० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक त्याबरोबरच २००० पोलीस कर्मचारी व बाहेरून एसआरपीच्या दोन कंपन्या मागवल्या आहेत. असा उद्या ईद निमित्त पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी आनंदात ईद सण साजरा करावा. कुठेही कोणीही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. जर कोणी गैरकृत्ये करत असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी असे आव्हान पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.